
Devotees preparing for Lakshmi Puja on October 21, following Dharmashastra guidance for the auspicious muhurat.
Sakal
सोलापूर : यंदाच्या दिवाळीतील अमावास्या तिथी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होऊन मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम न बाळगता मंगळवारी लक्ष्मीपूजन करणे योग्य राहील. धर्मसिंधू, पुरुषार्थ, चिंतामणी, तिथीनिर्णय आदी ग्रंथांमधील वचनांनुसार या दिवशी लक्ष्मीपूजनासाठीचा मुहूर्त धर्मशास्त्रसंमत आहे. यावर्षी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा, २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज याप्रमाणे ४ दिवस दिवाळी सणाचे आहेत.