Solapur News : ढोबळेचा शाहू परिवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी

भाजपा व महायुतीचे उमेदवाराच्या समर्थनार्थ शाहू परिवाराचा मेळावा वाघोली येथील महात्मा फुले सूतगिरणी येथे झाला.
Ram Satpute
Ram SatputeSakal

मंगळवेढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली. त्यांच्या नेतृत्वातच भारत वेगाने प्रगती करत आहे. शाहू परिवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहण्याची घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केले.

भाजपा व महायुतीचे उमेदवाराच्या समर्थनार्थ शाहू परिवाराचा मेळावा वाघोली येथील महात्मा फुले सूतगिरणी येथे झाला. त्यावेळी बोलत होते. व्यासपीठावर यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड,

रवी वाघमोडे, संतोष दामोदरे, गणेश भोसले, रामचंद्र पतंगे आदी उपस्थित होते. आणि बोलताना आमदार सातपुते म्हणाले की गेली दहा वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला तरी विरोधकांनी दहा वर्षात काय केले असा सूर लावला जिल्ह्यात महामार्ग शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना स्मार्ट सिटी असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

राहिलेले विकास कामे मार्ग लावण्यासाठी शाहू परिवाराने आपल्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली हे मी कधीही विसरू शकत नाही.अध्यक्ष अभिजीत ढोबळे म्हणाले, आ. सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात कोट्यावधीचा निधी आणून विकास केला. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर केले.

त्यांना दिल्लीला पाठविल्यास जिल्ह्यातील विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे महात्मा फुले सुत गिरणीच्या सर्व सभासदांनी तसेच शाहू परिवाराच्या सर्व सदस्यांनी आ. सातपुते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक शाहू परिवाराचे राजेंद्र पोतदार यांनी केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com