
Pilgrims from Haryana and Mumbai at Tuljapur Temple, showcasing devotion and unity across religions during Dharmiya Salokhya darshan.
Sakal
सोलापूर : धर्म वेगळा असला तरी आई तुळजाभवानीच्या दर्शनाची आस सर्वांनाच असते. तिला सर्व लेकरे समानच असतात. सोमवारच्या कोजागरी पौर्णिमेला देवीची मंचकी निद्रा समाप्त होत असल्याने तिच्या दर्शनासाठी सर्व धर्मीय भक्तांची गर्दी तुळजापूर रोडवर झाली आहे. उन्हातानाची काळजी न करता हजारो भक्तांची पावले तुळजापूरच्या दिशेने निघाली आहेत.