esakal | Solapur : दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर एसटीच्या 58 गाड्यांचे नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

सोलापूर : दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर एसटीच्या 58 गाड्यांचे नियोजन

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर - आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने बसने प्रवास करणा-या प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनास गती मिळत आहे. सोलापूर विभागांकडून दीपावलीमध्ये गर्दी टाळण्यासाठी 58 बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे तसेच लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाच्या बसेसची चाके धावू शकली नाहीत. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न घटल्याने महामंडळाचे अर्थकारण धोक्‍यात आले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटीची रुतलेली चाके पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचबरोबर आगामी दीपावली सणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता विभागाकडून 58 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या 30 ऑक्‍टोबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: पतीच्या निधनानंतर खचून न जाता केला मुलाला फौजदार!

महत्वाच्या सणापैकी दिवाळी हा महत्त्वाचा सण असून, अनेक जण दिवाळीनिमित्त पुण्याहून सोलापूरला व सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची गर्दी पाहून विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर इतर मार्गावर देखील गाड्यांचे नियोजन करण्याचे काम एसटी कर्मचारी व अधिकारी करत असल्याचे सांगण्यात आले.

ता. 4 ऑक्‍टोबरपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी शहरी भागातील आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मासिक पास देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून देखील गाड्यांचे नियोजन करण्यात येत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

नवरात्र, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तसेच शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 30 ऑक्‍टोबरपासून गाडया धावणार आहेत.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

loading image
go to top