ठेवीदारांसाठी 'लक्ष्मी'चे संचालक कर्जदारांच्या दारी!

ठेवीदारांसाठी 'लक्ष्मी'चे संचालक कर्जदारांच्या दारी! सुरू झाली थकबाकी वसुली
Laxmi Bank
Laxmi BankSakal
Summary

आर्थिक अडचणीतून मार्ग काढत असताना लक्ष्मी बॅंकेचे संचालक मंडळ आता कर्ज वसुलीच्या मैदानात उतरले आहे.

सोलापूर : आर्थिक अडचणीतून मार्ग काढत असताना दि लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे (The Lakshmi Co-operative Bank) संचालक मंडळ आता कर्ज वसुलीच्या मैदानात उतरले आहे. बॅंकेने काही थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केली असून, त्याचा लवकरच जाहीर लिलाव केला जाणार आहे. दुसरीकडे, ज्या कर्जदारांना वारंवार नोटिसा बजावूनही कर्जाचा भरणा केला नाही, त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली जाणार असून, तसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जात आहेत. बॅंक आता पुन्हा सावरू लागली असून बॅंकेचे संचालक ठेवीदारांचा विश्‍वास संपादित करीत आहेत.

Laxmi Bank
काय आहे भारतातला ड्रग्सविरोधी कायदा? जाणून घ्या सविस्तर

लक्ष्मी बॅंकेची थकबाकी वाढल्याने खातेदारांसह ठेवीदारांना रोखीने पैसे द्यायला रोकड कमी पडू लागली. त्याचा अपप्रचार एवढा झाला की, बॅंकेत ठेवीदारांची लांबलचक रांगच लागली. बॅंकेत ठेवीदारांच्या 429 कोटींच्या ठेवी होत्या. परंतु, अपप्रचारामुळे त्या काही दिवसांतच सव्वादोनशे कोटींवर आल्या. काही संचालक बॅंकेत ठाण मांडून आहेत, तर ज्येष्ठ संचालक कमलाकर कुलकर्णी, आनंद बडगंची, बालाजी जक्‍का यांच्यासह काही संचालक कर्ज वसुलीसाठी बाहेर पडले आहेत. काही झाले तरी सर्वसामान्यांची बॅंक वाचलीच पाहिजे, ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करून बॅंक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मागील आठ दिवसांत बॅंकेने दोन-अडीच कोटींची वसुली केली असून, काहींची मालमत्ताही जप्त केली आहे. ठेवीदारांची गरज पाहून त्यांना वाढीव रक्‍कम दिली जात असल्याचेही संचालक जक्का यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

25 कर्जदारांकडे 80 कोटींची थकबाकी

ठेवीदारांना चांगले व्याज मिळावे, बॅंकेचा चांगला व्यवसाय होऊन नफा मिळावा म्हणून ठेवीची रक्‍कम कर्ज स्वरूपात वाटप केली जाते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे काही नियमित कर्जदारांकडील कर्ज थकबाकीत गेले. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यवहार वाढले आणि ठेवीदारांना पैसे देण्याची पंचाईत झाली. परंतु, आता बॅंकेने कठोर पाऊल उचलून थकबाकीदारांकडून सक्‍तीची वसुली सुरू केली आहे. दरम्यान, 25 मोठ्या थकबाकीदारांकडे बॅंकेचे 80 कोटी रुपये आहेत. त्यांच्यावर आता संचालकांनी फोकस केला आहे.

Laxmi Bank
पोलिस भरतीवेळी बनावटगिरी! डुप्लिकेट टोप घातला अन्‌ झाला जेरबंद

ठेवीदारांची रक्‍कम संपूर्णपणे सुरक्षित असून ठेवीदारांच्या रकमेवर 51 लाखांचा विमा बॅंकेने उतरविला आहे. त्याची मुदत मार्च 2022 पर्यंत असल्याने कुणीही चिंता करू नये, सर्वांचेच पैसे मिळतील. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, काही महिन्यांत बॅंक पूर्वपदावर येईल.

- बालाजी जक्‍का, संचालक, लक्ष्मी को-ऑप. बॅंक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com