
“Commissioner’s driver sets fitness example — runs 21 km daily, wins 55 marathons across Maharashtra.”
sakal
सोलापूर: धावण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती कायम रहाते या हेतूने पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या शासकीय वाहनाचे चालक अंमलदार लगमण्णा माळी (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) हे दररोज २१ किमी धावतात. वयाची चाळिशी सुरू असूनही त्यांचा हा सराव अखंडित आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ५५ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन त्यात पारितोषिके पटकावली आहेत. आता ते ‘सकाळ’तर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये पोलिस आयुक्तांसमवेतही धावणार आहेत.