

“Congress Will Not Collapse, Says Sharad Pawar — What Exactly Did He Mean?”
Sakal
सोलापूर : निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र व बिहारमध्ये सरकारने लाडकी बहीण नावाची योजना आणली. सरसकट दहा हजार रुपये देणारी अशी योजना कधी पाहिली नव्हती, त्या योजनेचा हा परिणाम आहे का? याचा विचार सामान्यांनी करावा. संसदेचे अधिवेशन १ ते १९ डिसेंबर या दरम्यान आहे. देशातील प्रमुख विरोधकांना एकत्र घेऊन आम्ही या योजनांवर चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीच्या योजनांबाबत काही तरी धोरण ठरविले पाहिजे यावर आम्ही चर्चा करणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.