दिव्यांगाचा निधी मार्चपूर्वी खर्च करा; अन्यथा खुर्ची कार्यालयाबाहेर

गटविकास अधिकारी खुर्ची कार्यालया बाहेर काढण्याचा इशारा अपंग प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला
Divyang people funds release before March Otherwise protest against Officer solapur
Divyang people funds release before March Otherwise protest against Officer solapursakal

मंगळवेढा : तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीनी दिव्यांगासाठीचा निधी अद्याप खर्च केला नाही.हा निधी 31 मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा गटविकास अधिकारी खुर्ची कार्यालया बाहेर काढण्याचा इशारा अपंग प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला. तालुक्यातील दिव्यांगाच्या विविध प्रश्नांच्या मागण्यासाठी येथील प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते त्यावेळी हा इशारा दिला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय जगताप जिल्हा उपाध्यक्ष सिद्राम माळी,तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,वंदना माने, गणेश ननवरे, ज्ञानेश्वर गायकवाड, दत्तात्रय चौगुले, राकेश पाटील, रोहिदास कांबळे, शकील खाटीक, संभाजी मस्के, रुक्मिणी कोकरे, शिवानंद नराळे,भारत आसबे शिवाजी सरसंबे,सुनील केदार शकुंतला शिरसागर,कांताना बिराजदार, रमेश चोरडे,कल्लाप्पा माळी, अनिल दोडमिसे, बालाजी भगरे सुरेश पाटील श्रावण कांबळे आनंद गुंगे भाग्यवान रणदिवे बाळासो सुपनर, जयंतराव ठेंगील, पिंटु कोळेकर,आदीजण उपस्थित होते दिव्यांगासाठी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीने दरवर्षी येणाऱ्या निधीतून निधी खर्च करणे अपेक्षित होते परंतु अद्याप जवळपास 20 ग्रामपंचायतीने निधी खर्च केला नाही.

निधी खर्चावरून संबंधित ग्रामपंचायतीवर कोणती कारवाई केली असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर गटविकास अधिकारी यांना बोलता येईना, दिव्यांगासाठी प्रपत्र ड मधून घरकुलाचा लाभ देण्याबाबत प्राधान्याने विचार करण्यात यावा, याशिवाय पंचायत समितीसाठी अपंगांना स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा जेणेकरून शासनाच्या अपंगासाठी असणारा योजनेची माहिती त्यांना सहज रित्या उपलब्ध होऊ शकेल,दिव्यांगासाठी जि.प.च्या वतीने योजनेच्या लाभासाठी पं.स. सदस्य व जि. प. सदस्यांच्या शिफारस अट रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. दिव्यांगांच्या भावना तीव्र झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना प्रशासनाला नाकी नऊ आले. अखेरीस माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ, यांनी मध्यस्थी करत या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. व त्यांचे प्रश्न 31 मार्चपूर्वी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.त्यानंतर हे उपोषण थांबविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com