

Thousands Paid for DMIT Reports as Fingerprint Test Claims Face Serious Doubts
sakal
सोलापूर : विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे अपेक्षित असताना, काही ठिकाणी अंगठ्याच्या ठशांवर आधारित तथाकथित बहुविध बुद्धिमत्ता चाचणी (डीएमआयटी)च्या नावाखाली भोंदूगिरी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य सांगितल्याचा दावा करत हजारो रुपये आकारले जात असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.