esakal | तुमच्या वाहनास फास्टॅग आहे का? अन्यथा, 15 फेब्रुवारीपासून तुम्हाला द्यावा लागेल दुप्पट टोल

बोलून बातमी शोधा

0Fastag_1.jpg

...अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
रस्त्यांच्या कनेक्‍टिव्हीटीमुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, टोल नाक्‍यांवरील वाहनांच्या रांगा अद्याप कमी न झाल्याने वाहनधारकांना त्यांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब लागत आहे. टोल भरुनही टोलनाक्‍यांवरील गर्दीचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत असून अनेकदा वादाच्या प्रसंगालाही तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर 15 फेब्रुवारीपासून महामार्गावरुन ये- जा करणाऱ्या प्रत्येक वाहनास फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आला असून अन्य बुथ बंद करण्यात येणार आहे. मात्र, फास्ट टॅगसाठी वारंवार मुदतवाढ देऊनही ते बसवून न घेणाऱ्या वाहन चालकास दुप्पट टोल भरुन पुढे सोडले जाणार आहे. 

तुमच्या वाहनास फास्टॅग आहे का? अन्यथा, 15 फेब्रुवारीपासून तुम्हाला द्यावा लागेल दुप्पट टोल
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात महामार्गांचे जाळे विस्तारत असून त्यामुळे अन्य जिल्ह्यांशी कनेक्‍ट वाढला आहे. आता सोलापूर- सांगली या महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु असून सोलापूर- अक्‍कलकोट हा रस्ताही उत्तम झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात नव्या तीन टोल नाक्‍यांची भर पडणार आहे.

...अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
रस्त्यांच्या कनेक्‍टिव्हीटीमुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, टोल नाक्‍यांवरील वाहनांच्या रांगा अद्याप कमी न झाल्याने वाहनधारकांना त्यांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब लागत आहे. टोल भरुनही टोलनाक्‍यांवरील गर्दीचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत असून अनेकदा वादाच्या प्रसंगालाही तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर 15 फेब्रुवारीपासून महामार्गावरुन ये- जा करणाऱ्या प्रत्येक वाहनास फास्टॅग बंधनकारक करण्यात आला असून अन्य बुथ बंद करण्यात येणार आहे. मात्र, फास्टॅगसाठी वारंवार मुदतवाढ देऊनही ते बसवून न घेणाऱ्या वाहन चालकास दुप्पट टोल भरुन पुढे सोडले जाणार आहे. 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, लातूर, नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमधील रस्ते महामार्गांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सोलापूर- तुळजापूर, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- विजयपूर या महामार्गांपैकी काही महामार्गांची कामे यापूर्वी पूर्ण झाली असून काही ठिकाणी आणखी काम सुरु आहे. तर केगाव (शिवाजी नगर) येथून सोलापूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गाला जोड देऊन सोलापूर- विजयपूर महामार्गाचे काम सुरु आहे. दुसरीकडे सोलापूर- सांगली या 198 किलोमीटरच्या महामार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे सोलापूर- अक्‍कलकोट हा 40 किलोमीटरचा महामार्गाही पूर्ण होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आणखी तीन टोल नाके वाढणार आहेत. त्यामध्ये वळसंग (ता. अक्‍कलकोट), इचगाव (ता. मोहोळ) आणि अनकढाळ (ता. सांगोला) याठिकाणचा समावेश आहे. त्याच सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथेही एक टोल नाका केला जाणार आहे. या नव्या महामार्गावरुन ये- जा करणाऱ्या वाहनांसाठी किती टोल आकारला जावा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. आगामी सहा महिन्यांत या टोल नाक्‍यांची उभारणी करुन तेथून ये- जा करणाऱ्यांना वाहनांकडून टोल वसूल केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.