महावितरणच्या रडारवर आता घरगुती, व्यावसायिक ग्राहक

वारंवार आवाहन करूनही थकबाकी न भरलेल्या घरगुती, व्यावसायिक ग्राहकांचे कनेक्‍शन तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. मागील दीड महिन्यात महावितरणने अकृषिक साडेअकरा हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा Sakal

सोलापूर : वारंवार आवाहन करूनही थकबाकी न भरलेल्या घरगुती, व्यावसायिक ग्राहकांचे कनेक्‍शन तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. मागील दीड महिन्यात महावितरणने अकृषिक साडेअकरा हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
वाशिम, हिंगोली, यवतमाळ कोरोनामुक्‍त! 11 तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर

वीज ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारीदेखील सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध करून दिली आहे. पुणे विभागाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने एक लाख 38 हजार 675 घरगुती ग्राहकांकडे 25 कोटी 48 लाख रुपयांची तर 11 हजार 150 व्यावसायिक ग्राहकांकडे चार कोटींची थकबाकी आहे. तसेच दोन हजार 380 औद्योगिक ग्राहकांकडै पावणेतीन कोटींची तर एक हजार 842 सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे 85 कोटींची थकबाकी आहे. पथदिव्यांची तब्बल 482 कोटींची, अशी एकूण 602 कोटींची थकबाकी वसूल केली जात आहे. मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील 11 हजार 480 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणांची भरारी पथकाद्वारे पडताळणी केली जात आहे. तसेच थकबाकीदारांनी शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबल टाकून वीज घेतली असल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
सोलापूर : युपीएससीच्या परिक्षेत अपयश पण MPSC तुन एकाचवर्षी दोन पदाला गवसणी

थकबाकीदारांसाठी अभय योजना
कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा 31 डिसेंबर 2021 पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झाला आहे, त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 'विलासराव देशमुख अभय योजना' सुरू केली आहे. त्यानुसार थकबाकीवरील 100 टक्के व्याज व विलंब आकार माफ केले जात आहे. तसेच मूळ थकबाकी भरण्यासाठी सहा हप्ते पाडून दिले जात आहेत. एकाचवेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के व लघुदाब ग्राहकांना दहा टक्के अतिरिक्त सवलत दिली जात आहे.

महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
सीमावाद! सोलापूर, अक्‍कलकोट आमचेच, बेळगाव, निपाणी, कारवारही सोडणार नाही

महिन्याची थकबाकी, तरीही कनेक्‍शन तोडणी
अकृषिक (घरगुती, व्यावसायिक) ग्राहकांकडे एक महिन्याचे वीजबिल थकीत असेल, तर ते किती आहे हे न पाहता थेट त्या ग्राहकाचे कनेक्‍शन तोडले जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांना तशा सूचना दिल्या आहेत. संबंधित ग्राहकांनी त्यांच्याकडील वीजबिल पूर्णपणे भरल्यानंतरच त्याचे कनेक्‍शन जोडून दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com