esakal | जिल्ह्यातील 150 केंद्रांवर आज मिळणार दोन लसींचे डोस!
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील 150 केंद्रांवर आज मिळणार दोन लसींचे डोस!

जिल्ह्याला कोरोना लसीचे दोन लाख डोस मिळाले आहेत. आज (शनिवारी) एकाच दिवशी जिल्ह्यातील 150 केंद्रांवर दोन लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 150 केंद्रांवर आज मिळणार दोन लसींचे डोस!

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला (Solapur District) कोरोना लसीचे (Covid Vaccine) दोन लाख डोस मिळाले आहेत. आज (शनिवारी) एकाच दिवशी जिल्ह्यातील 150 केंद्रांवर दोन लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne) यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 16 लाख 14 हजार 20 जणांनी आतापर्यंत कोरोनाची लस (Vaccination) घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा: ताशांचा आवाज कुठं नाय झाला, तरीही बाप्पा माझा थाटात आला !

आतापर्यंत 55 वेळा कोविशिल्डच्या लसचे 14 लाख 22 हजार 840 डोस मिळाले आहेत. कोवॅक्‍सिनचे 28 वेळा 82 हजार 640 इतके डोस आले आहेत. ऑगस्टपर्यंत 11 लाख 74 हजार 310 जणांना कोरोनाचा पहिला तर 4 लाख 39 हजार 720 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण लसीकरण 16 लाख 14 हजार 30 इतके झाले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात लसीकरणात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न थकता काम केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी लसीचा कमी साठा मिळत होता. तो वाढवून द्यावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्य विभागाकडे डोस वाढवून देण्याबाबत सातत्याने मागणी केली होती, अशी माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली.

हेही वाचा: आले गणराय! स्वागतासाठी रमले बच्चेकंपनीसह कुटुंबीयही

आज शहरात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध

आज (शनिवारी) शहरातील सर्वच केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविशिल्ड लसीचा मोठा साठा महापालिकेकडे उपलब्ध झाल्याने प्रति केंद्रावर 400 लस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सोलापूर शहरातील सरकारी व खासगी असे एकूण 41 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. वय वर्षे 18 पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रति केंद्रावर ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने पहिल्या डोससाठी 200 तर दुसऱ्या डोससाठी 200 असे एकूण 400 लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक मोठा साठा असून, तब्बल उपलब्ध साठ्यातून शहरातील 16 हजार 400 नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

loading image
go to top