
सोलापूर : प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेतील मनीषा मुसळे-माने यांच्या जामिनावर शनिवारी (ता. २३) होणारी सुनावणी आता सोमवारी (ता. २३) होणार आहे. वकील आजारी असल्याने सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी सरकार पक्षाने केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.