
सोलापूर : पोलिसांनी न्यायालयाला डॉ. शिरीष वळसंगकर यांचे सीडीआर दिले आहे. यातून शेवटच्या तीन दिवसांत ते एकाच व्यक्तीशी तब्बल ११ वेळा बोलल्याचे दिसते. हे कॉल आणि “मनीषाचे घाणेरडे आणि खोटारडे आरोप’’ हा धागा आता पुरवणी दोषारोपपत्रातून जोडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.