
सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित मनीषा मुसळे माने यांची पोलिस कोठडी गुरुवारी संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत पोलिसांचा तपास पूर्ण झाला, की आणखी कोठडीची गरज आहे, हे उद्या स्पष्ट होणार आहे.