esakal | नॉर्थकोटच्या मैदानावर होणार डॉ. आंबेडकर उद्यान व संविधान भवन ! जागा हस्तांतराचे महापालिकेला पत्र

बोलून बातमी शोधा

4dr_20B_20R_20AMBEDKAR.jpg

आदेशातील ठळक बाबी...

  • उद्यानासाठी दिलेल्या जागेवर स्वतंत्र कनेक्‍शन घेण्यात यावे
  • जागा आरक्षित उद्यान जागेचे आरक्षण बदलाबाबत करावयाच्या कार्यवाहीची सोलापूर महापालिकेवर जबाबदारी
  • जागेचा वापर उद्यानाशिवाय अन्य कोणत्याही उद्देशासाठी वापर करताना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाची परवानगी बंधनकारक
  • उद्यानात नागरिकांसाठी बसायला सोय करून द्यावी; संरक्षक भिंत बांधून त्याचा देखभाल-खर्चाची महापालिकेवर जबाबदारी
  • जागेची देखभाल, स्वच्छता, सरंक्षणाची महापालिकेवर जबाबदारी; अतिक्रमण होणार नाही याची महापालिकेने घ्यावी खबरदारी
नॉर्थकोटच्या मैदानावर होणार डॉ. आंबेडकर उद्यान व संविधान भवन ! जागा हस्तांतराचे महापालिकेला पत्र
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : नॉर्थकोट मैदानाची जागा आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवनासाठी देण्याचा निर्णय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने घेतला आहे. आदेशाची प्रत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकांना व महापालिका आयुक्‍तांना पाठविण्यात आली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्णय कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळाले.

आदेशातील ठळक बाबी...

  • उद्यानासाठी दिलेल्या जागेवर स्वतंत्र कनेक्‍शन घेण्यात यावे
  • जागा आरक्षित उद्यान जागेचे आरक्षण बदलाबाबत करावयाच्या कार्यवाहीची सोलापूर महापालिकेवर जबाबदारी
  • जागेचा वापर उद्यानाशिवाय अन्य कोणत्याही उद्देशासाठी वापर करताना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाची परवानगी बंधनकारक
  • उद्यानात नागरिकांसाठी बसायला सोय करून द्यावी; संरक्षक भिंत बांधून त्याचा देखभाल-खर्चाची महापालिकेवर जबाबदारी
  • जागेची देखभाल, स्वच्छता, सरंक्षणाची महापालिकेवर जबाबदारी; अतिक्रमण होणार नाही याची महापालिकेने घ्यावी खबरदारी

महापालिकेने काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्यान व संविधान भवन उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी महापालिकेसमोरील नॉर्थकोटची एक एकर जागा त्यासाठी देण्याचा ठराव करून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर अशोक जानराव यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आयुक्‍तांसोबत बैठक पार पडली होती. त्यावेळी जागा हस्तांतरणाचा निर्णय झाला होता आणि त्याचा आदेश आज निघाला. त्यासाठी जानराव यांच्यासमवेत कृती समितीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे, महासचिव राजरत्न थडसरे, गौतम मसलखांब, ऍड. प्राची गाडे, दत्ता गायकवाड, मानद सचिव सिध्दार्थ जाधव, नागेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. आमदार प्रणिती शिंदे यांनीही या कामासाठी मोठी मदत केली, असे जानराव यांनी आवर्जुन सांगितले.

14 एप्रिलला कामाचा व्हावा शुभारंभ
शासनाने नॉर्थकोटची जागा महापालिकेला हस्तांतर करण्यास परवानगी दिली आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या कामाचा शुभारंभ व्हावा, अशी मागणी "सकाळ'च्या माध्यमातून आयुक्‍त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे करेन. 
- अशोक जानराव, अध्यक्ष उद्यान व संविधान कृती समिती, सोलापूर