Solapur News : गटारी व नाले साफ करण्याची साडेदहा लाख रुपयाची मोहोळ नगरपरिषदेची मशीन धुळखात

पैशांची उधळपट्टी करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना या मशीनचे उद्घाटन करण्याचा प्रत्यक्ष मुहूर्त कधी सापडणार?
drainage cleaning machine of mohol council
drainage cleaning machine of mohol councilSakal

Mohol News: सुमारे 45 हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहरात नगरपरिषद स्थापने पासून सार्वजनिक स्वच्छतेला फारसे महत्व दिले गेले नाही. अनेक प्रभागांत ठिक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे, तर दुसरीकडे नगरपरिषद प्रशासनाने अडीच वर्ष होऊन सुद्धा तब्बल साडे दहा लाख रुपयांची गटारी साफ करण्याची मशीन खरेदी केली आहे.

वर्षभरा पासून ही मशीन धूळखात पडुन आहे. पैशांची उधळपट्टी करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना या मशीनचे उद्घाटन करण्याचा प्रत्यक्ष मुहूर्त कधी सापडणार? असा संतप्त सवाल शहरातील सुज्ञ नागरिकां मधून विचारला जातोय.

गेल्या ५ वर्षांपूर्वी मोहोळ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले. या झालेल्या बदलामुळे ग्रामपंचायती पेक्षा नगरपरिषदेला कोटयावधीचा निधी उपलब्धता होऊ लागला. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा ही वाढला.

प्रत्यक्षात नगरपरिषद अस्तित्वात आल्या पासून मोहोळ शहरांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. शहरातील अनेक प्रभागांमध्ये तुंबलेल्या गटारी, त्यातून रस्त्यावरच वाहणारे अस्वच्छ पाणी यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

त्यावर उपाय योजना करण्यासाठी असलेल्या नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीला मार्च 2019 मध्ये तब्बल साडेदहा लाख रुपयांची गटारींची स्वच्छता करणारी मशीन आणण्यात आली. मात्र ती मशीन मोहोळच्या नगरीत दाखल झाल्या पासून अद्याप पर्यंत तरी करदात्या नागरिकांच्या उपयोगाला पडली नाही.

सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारणे आवश्यक आहे. यामुळे तुंबलेल्या गटारीतुन येणाऱ्या अस्वच्छ पाण्याचा घाण वास घेत अनेक प्रभागातील नागरिक स्वतःला दोष देत हातात खोरे, लाकडांची दांडकी घेऊन गटारी साफ करतानाचे चित्र आहे.

वर्षाकाठी हजारो रुपयांचा कर भरणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधा देण्या ऐवजी मोहोळ नगरपरिषद प्रशासनाने मात्र गटारी साफ करण्याची वेळ नागरीकावर आणली आहे.

साडेदहा लाख रुपये खर्चून नाला सफाई साठी आणलेली मशीन नेमकी कुणासाठी व कोणाच्या हट्टासाठी आणली हा जरी संशोधनाचा विषय असला तरी या मशीनचा नागरिकांना अस्वच्छते तुन मुक्त करण्यासाठी कधी फायदा होणार? असा संतप्त सवाल मोहोळ शहरातील सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

एखाद्या नागरिकाकडे कराची थकबाकी असली तर त्याला नगरपरिषद प्रशासन बाकी भरून घेतल्या शिवाय दाखला देत नाही. साडे दहा लाख रुपये खर्चून आणलेली गटार साफ करण्याची मशीन एक वर्षांपासून धूळ खात पडून आहे या बाबत कोणच का बोलत नाहीत.आगामी निवडणुकीत नियोजीत नगरसेवकांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मशीन घेऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र ती मशीन चालविण्यासाठी ऑपरेटर नाही. जेसीबी प्रमाणे ती मशीन चालवावी लागते. सध्याच्या रस्त्याची रुंदी व त्या मशीनच्या बकेट चा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे गटारी काढणे अडचणीचे झाले आहे. ती मशीन चालवणाऱ्या ऑपरेटरची पगार नगर परिषदेला ही परवडली पाहिजे त्यामुळे ती मशीन बसून आहे.

- अमित लोमटे, नगर अभियंता आरोग्य विभाग मोहोळ नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com