Entrepreneur Success:संकटातून साकारले स्वप्न! भक्तांना बालाजी दर्शन घडवत बोल्ली यांनी फेडला नवस;आगीत उद्ध्वस्त बालाजी स्पिनिंग मिल तीन वर्षांत उभी..

Balaji Spinning Mill Rebuilt After fire in Three years: आगीनंतर पुन्हा उभा राहिला बालाजी स्पिनिंग मिल; बोल्ली यांनी फेडला नवस
Rebuilt Balaji Spinning Mill standing strong after a devastating fire, symbolising faith and determination.

Rebuilt Balaji Spinning Mill standing strong after a devastating fire, symbolising faith and determination.

Sakal

Updated on

सोलापूर: संकटाच्या काळात खचून न जाता ईश्वरावरील अढळ श्रद्धा आणि अथक परिश्रमांच्या जोरावर कशी भरारी घेता येते, याचे उत्तम उदाहरण उद्योजक बालराज बोल्ली यांनी घालून दिले आहे. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी लागलेल्या भीषण आगीत बालाजी स्पिनिंग मिल्स कारखाना आणि इमारत जळून खाक झाली होती. अवघ्या काही वर्षांत तो पुन्हा उभा करून बोल्ली यांनी नवस फेडला. यानिमित्त त्यांनी कामगार व मित्र परिवारासह ८० भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन घडवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com