Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Solapur Drunk murder case accused surrenders after crime details: दारूच्या नशेत किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून; दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येताच आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर
Minor Altercation Ends in Murder; Accused Surrenders After Alcohol Wears Off

Minor Altercation Ends in Murder; Accused Surrenders After Alcohol Wears Off

sakal

Updated on

सोलापूर: येथील कलावती नगरातील तेलुगु शाळेच्या मैदानात शनिवारी (ता. २५) मध्यरात्री महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे (वय २१, रा. कलावती नगर) हा झोपला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सोमनाथ नागराज जवळकोटे याचा पाय महेशला लागला. महेशने सोमनाथला शिवीगाळ केली. त्या रागातून सोमनाथने तेथील दगड उचलून महेशच्या डोक्यात घातला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याने दुसऱ्या दिवशी (रविवारी) सकाळी सोमनाथ स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com