सोलापुर : "हरभरे खाल्ले हात कोरडे "अशी दुग्ध उत्पादकांची अवस्था

महिन्याभरा पासून दुधाचा प्रतिलिटर नऊ ते दहा रुपये दर वाढला
"Dry hands after eating a gram" milk producers condition
"Dry hands after eating a gram" milk producers condition sakal

मोहोळ : गेल्या महिन्याभरा पासून दुधाचा प्रतिलिटर नऊ ते दहा रुपये दर वाढला असला तरी त्यापेक्षा कितीतरी जादा दर हे पशुखाद्य व चाऱ्याचे झाल्याने दूध उत्पादकांची अवस्था "हरभरे खाल्ले हात कोरडे"अशी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दूग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीतून विविध पिकाच्या माध्यमातून येणारे उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून आहे. मात्र रोजचा प्रापंचिक खर्च भागविण्या साठी दूग्ध व्यवसायाला मोठे महत्त्व दिले जाते. ग्रामीण भागात एका एका शेतकऱ्याकडे किमान 10 ते 12 जर्सी गाई आहेत, एका गाई ची किंमत तिच्या टक्केवारीनुसार 90 हजार ते एक लाख रुपये एवढी आहे. दूध व्यवसायाच्या मुळे दुधाच्या पैशा बरोबरच शेणा च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीला खत मिळते.

दुभती जनावरे संभाळणे म्हणजे सध्या तारेवरची कसरत आहे. त्यासाठी वर्षाला दोन मजुराला किमान दोन लाख रुपये द्यावे लागतात. शिवाय जनावरांच्या दवाखान्याचा होणारा खर्च वेगळाच. अनेक शेतकऱ्यांना हिरवा, वाळला चारा विकत ध्यावा लागतो, त्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. शिवाय जनावरांच्या सुरक्षेसाठी चार ते पाच लाख रुपये खर्चून गोठा ही बांधावा लागत आहे. एकुण हिशोब केला तर दूध दरवाढ, इतर खर्च याचा ताळमेळ बसत नाही. केवळ आठवड्याला हातात चलन फिरते म्हणून हा व्यवसाय केला जात आहे.

असे आहेत पशुखाद्य व चाऱ्याचे दर

  • हिरवी मका- 2 हजार रुपये गुंठा

  • कडवळ- 1500 ते 1700 रुपये गुंठा

  • पशुखाद्य- 1 हजार 350 रुपये प्रति 50 किलो

  • शेंगदाणा पेंड- 2 हजार 800 रुपये पोते

  • मका भरडा-1हजार 350 रुपये प्रति 50 किलो

  • हिरवे उसाचे वाडे- दहा रुपये भेळा

  • कडबा-20 रुपये प्रती पेंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com