Mango Season : हवामान बदलामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये बाजारात उपलब्ध होणार

सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन स्टेजमध्ये मोहर आला होता. त्यामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये म्हणजे एप्रिल, मे व जून महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती कोर्टी (ता. पंढरपूर) येथील आंबा बागायतदार सचिन कुलकर्णी यांनी 'सकाळ ' शी बोलताना दिली.
Mango Season
Mango Seasonsakal

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन स्टेजमध्ये मोहर आला होता. त्यामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये म्हणजे एप्रिल, मे व जून महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती कोर्टी (ता. पंढरपूर) येथील आंबा बागायतदार सचिन कुलकर्णी यांनी 'सकाळ ' शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी डाळिंब फळबागेची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती. मात्र मागील काही वर्षांमध्ये तेल्या व मर रोगामुळेमुळे डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचा कल केशर आंबा, पेरू, केळी, सिताफळ आदी फळबागांची लागवड करण्याकडे वाढला आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये केशर आंबा फळबागेचे एकूण क्षेत्र सुमारे ४९० हेक्टर आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे आंब्याच्या झाडांना जास्त ताण मिळाल्याने व थंडीच्या हंगामामध्ये सकाळी सरासरी १५ अंश तापमान राहिल्याने यंदा बहुतांश आंब्याच्या झाडांना लवकर मोहर आला.

तर नंतर वातावरणात बदल झाल्यामुळे त्याच झाडांना उशिरा मोहर आला. त्यामुळे सध्या केशर आंब्याच्या झाडाला तीन विविध आकाराची फळे पहावयास मिळत आहेत. सर्वात मोठ्या आकाराचा आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होईल. तर लिंबाएवढा आंबा मे मध्ये तर सुपारी एवढा आंबा जून अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल. त्यामुळे आंबा प्रेमी खवय्यांना यंदा तीन टप्प्यात मुबलक प्रमाणात केशर आंबा खावयास मिळणार आहे.

पर्जन्यमान घटल्यामुळे व हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंबा उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. यावर्षी बहुतांश आंबा बागेमधील विविध आकाराचे आंबे पाहता तीन टप्प्यामध्ये आंबा बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. - सूर्यकांत मोरे, पंढरपूर तालुका कृषी अधिकारी: मी मागील दहा वर्षापासून केशर आंब्याचे उत्पादन घेत आहे. मात्र यंदा प्रथमच आंब्याच्या झाडाला लहान मोठ्या आकाराची फळे लागली आहेत. मोठ्या आकाराचा आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होईल. व त्याला १५० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.- विलास देठे, आंबा बागायतदार, लक्ष्मी टाकळी, ता.पंढरपूर आम्ही सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेतो.

हवामान बदलामुळे यंदा टप्प्या टप्प्याने केशर आंबा बाजारात दाखल होईल. सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेत असल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त आंबा निर्यात होईल अशी अपेक्षा आहे.- सचिन कुलकर्णी, आंबा बागायतदार, कोर्टी (ता. पंढरपूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com