esakal | शंभर वर्षीय आजोबांची 16 तासांची झुंज अपयशी ! जिल्ह्यात वाढले 2486 रुग्ण; 42 मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona
शंभर वर्षीय आजोबांची 16 तासांची झुंज अपयशी ! जिल्ह्यात वाढले 2486 रुग्ण; 42 मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील हब्बूवस्ती (देगाव नाका) परिसरातील 100 वर्षीय आजोबा उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. मंगळवारी (ता. 27) दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यावर उपचार सुरू झाले. कोरोनाशी दोन हात करीत असतानाच बुधवारी (ता. 28) सकाळी सात वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 16 तासांची त्यांची झुंज अपयशी ठरली.

शहरात आज 339 रुग्ण वाढले असून 17 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात शेळगी परिसरातील प्रियंका चौक परिसरातील 92 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. दुसरीकडे जुळे सोलापुरातील वीरशैव नगरातील 40 वर्षीय तरुणाचा तर महोदव गल्ली (पश्‍चिम मंगळवार पेठ) येथील 46 वर्षीय व्यक्‍तीचाही समावेश आहे. ग्रामीणमध्ये आज दोन हजार 147 रुग्ण वाढले असून तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 24 वर्षीय तरुणासह पेनूर (ता. मोहोळ) येथील 35 वर्षीय आणि कसाब गल्ली (करमाळा) येथील 38 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

हेही वाचा: "सैराट'मधील आर्चीचं गाव पुन्हा चर्चेत ! काय केलंय या गावानं?

आज ग्रामीण भागात अक्‍कलकोट तालुक्‍यात 77, माढ्यात 431, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 58 रुग्ण आढळले आहेत. तर बार्शीत 171 रुग्ण वाढले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर करमाळ्यात 157 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. माळशिरसमध्ये 341 रुग्ण वाढले असून दोन, मंगळवेढ्यात 222 रुग्ण वाढले असून तिघांचा, मोहोळ तालुक्‍यात 180 रुग्ण वाढले असून चौघांचा, पंढरपूर तालुक्‍यात 290 रुग्ण वाढले असून सहाजणांचा, सांगोल्यात 175 रुग्ण वाढले असून एकाचा तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 65 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील 171 तर ग्रामीणमधील 881 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आता शहरातील रुग्णसंख्या 25 हजार 265 तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या 75 हजार 113 झाली आहे. शहर-जिल्ह्यातील दोन हजार 752 जण कोरोनाचे बळी ठरले असून आतापर्यंत 80 हजार 662 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरातील दोन हजार 955 तर ग्रामीणमधील 14 हजार नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: राज्यातल्या लसीकरणाला लागणार ब्रेक; कशी आहे परिस्थिती?

"त्या' तरुणावर कोरोनानेच मिळवला विजय

भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर 15 एप्रिलला सायंकाळी पावणेआठ वाजता त्याच्यावर मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचार सुरू झाले. अखेर त्याची जिद्द अपयशी ठरली आणि कोरोनानेच त्याच्यावर विजय मिळवला. 25 एप्रिलला पहाटे पाच वाजता त्याचा कोरोनाने बळी घेतला. दहा दिवस तो तरुण कोरोनाचा सामना करीत होता.