बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी सांडव्याचा भराव गेला वाहून

बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहून
बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहून
बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहूनCanva
Summary

अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण मागच्या तीन दिवसांच्या जोरदार पावसाने पुन्हा ओसंडून वाहत आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील कुरनूर धरण (Kurnoor Dam) मागच्या तीन दिवसांच्या जोरदार पावसाने (Heavy Rain) पुन्हा ओसंडून वाहत आहे. आज (शुक्रवारी) पहाटे धरणातून पुन्हा तीन दरवाजे उघडून 1800 क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर शिरवळवाडी तलाव तुडुंब भरून मोठ्या प्रमाणावर सांडव्यातून पाणी वाहत असून सांडव्याच्या जवळचे सर्व भराव वाहून गेल्याने गावकऱ्यांना तलाव पलीकडे असणाऱ्या शेतीकडे जाणे अडचणीचे ठरत आहे.

बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहून
'उजनी' @ 84.13 % ! पाणीसाठ्यात होतेय संथगतीने वाढ

तलावाच्या पलीकडील शेतीत जाण्यासाठी सांडव्याच्या वरूनच जावे लागते. तिथे प्रचंड पाणी आले आहे. त्याने रस्ता बंद झाला आहे. त्या ठिकाणी छोटासा पूल सांडव्याचे पाणी जाण्यासाठी बांधून द्यावा, अशी अनेक दिवसांची मागणी अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. तसेच मागील दीड महिन्यापूर्वी तलाव शेजारील व अडचणीची ठरणारी झाडे व काटेकुटे तोडण्यात आली आहेत, पण ती उचलून बाहेर फेकणे किंवा विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तिथेच टाकून दिल्याने पाणी जायला वाट मिळेनासे झाले आहे. प्रशासनास वारंवार विनंती करूनही काम करून दिले जात नाही, अशी तक्रार शेतकरी हणमंत घोदे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे.

अक्कलकोट तालुक्‍यात यावेळी सर्वच भागात तीन दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस होतच आहे. त्यातून पुन्हा बोरगाव ते घोळसगाव रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा रस्ता बंद पडला आहे. त्याने किरनळ्ळी व घोळसगाव संपर्क तुटला आहे. तसेच कुरनूरमधून सोडलेले पाणी व स्थानिक पाऊस यामुळे दुधनी रस्त्यावरील बोरी उमरगे पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे आणि सतर्कता म्हणून आपले कर्मचारी तिकडे पाठवून दिले आहेत. हा पाऊस तालुक्‍यातील अनेक भागात समाधानकारक झालेला आहे.

अक्कलकोटला तालुका 24 सप्टेंबर रोजीची नोंदलेली पावसाची आकडेवारी (कंसातील आकडेवारी एकूण पावसाची मिलिमीटरमध्ये)

  • अक्कलकोट : 35 (387)

  • चपळगाव : 34 (265)

  • वागदरी : 32(338)

  • किणी : 32(200)

  • मैंदर्गी : 20 (165)

  • दुधनी : 25 (234)

  • जेऊर : 16 (210)

  • करजगी : 11 (213)

  • तडवळ : 06 (184)

  • एकूण नऊ मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी बेरीज 2196 मिलिमीटर

सरासरी पाऊस एकूण (अक्कलकोट तालुका)

  • शुक्रवारचा पाऊस : 23.44 मिमी

  • एकूण पाऊस : 244 मिमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com