esakal | "उजनी'ची प्लसकडे वाटचाल! दौंडमधून साडेआठ हजार क्‍युसेकचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani Dam

'उजनी'ची प्लसकडे वाटचाल! दौंडमधून साडेआठ हजार क्‍युसेकचा विसर्ग

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने आता प्लसकडे वाटचाल सुरू केली आहे.

सोलापूर : जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने (Ujani Dam) आता प्लसकडे वाटचाल सुरू केली आहे. मायनस 22 टक्‍क्‍यांपर्यंत गेलेली पाणी पातळी आता मायनस तीन टक्‍क्‍यांपर्यंत आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रातील पावसामुळे पुढील काही आठवड्यात उजनी धरण प्लसमध्ये यईल, अशी माहिती सोलापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे (Irrigation Department Superintendent Engineer Dheeraj Sale) यांनी दिली. (Due to the flow of rain water from Daund, Ujani Dam is coming to Plus-ssd73)

हेही वाचा: दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

सोलापूर शहरासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी उजनीतून पाणी सोडले जाते. धरणामुळे जिल्ह्याला अनेकदा दुष्काळाच्या छळा पोचलेल्या नाहीत. रब्बीचा जिल्हा आता खरिपाकडे वाटचाल करताना त्यात उजनीचा मोलाचा वाटा राहिला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 39 साखर कारखाने (Sugar Mills) उभारले आहेत. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातून ग्रामीण अर्थकारणही बदलले आहे. पुणे जिल्ह्यासाठीही हे धरण तितकेच महत्त्वाचे ठरले असून, अनेक उद्योगांना धरणातून पाणी दिले जाते. शेती विकासात आणि उद्योगवाढीत धरणाचे मोठे योगदान आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पावसापेक्षाही पुणे (Pune) जिल्ह्यातील पावसामुळे अनेकदा धरण शंभर टक्‍के भरले आहे. पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. सध्या दौंडमधून (Dound) आठ हजार 791 क्‍युसेकने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत धरण प्लसमध्ये येईल आणि पावसाळा संपेपर्यंत धरण शंभर टक्‍के भरेल, असा विश्‍वासही साळे यांनी या वेळी व्यक्‍त केला. त्यामुळे आगामी वर्षभरातील पाण्याची गरज पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा : 61.87 टीएमसी

  • पाण्याची टक्‍केवारी : मानयस 3 टक्‍के

  • धरणात येणारा विसर्ग : 8,791 क्‍युसेक

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे दौंडवरून उजनी धरणात सध्या साडेआठ हजारांहून अधिक क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग येत आहे. धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत धरण प्लसमध्ये येईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

loading image