'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !

'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !
'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !
'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !Canva
Summary

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या पारधी / आदिवासी समाजाच्या मुलांपर्यंत "शिक्षण आपल्या दारी'च्या माध्यमातून शिक्षणाची गंगा पोचविली जात आहे.

सोलापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या पारधी (Pardhi) / आदिवासी (Adiwasi) समाजाच्या मुलांपर्यंत "शिक्षण आपल्या दारी'च्या माध्यमातून शिक्षणाची (Education) गंगा पोचविली जात आहे. वडाळ्याच्या श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूलमार्फत (Lokmanya English Medium School) राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे या मुला- मुलींना व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळत आहे.

'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !
लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !

शासनाच्या आदिवासी विभागातर्फे "नामांकित शाळा' ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू आहे. आदिवासी समाजाच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, ही मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावीत, शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठीची ही योजना होय. या योजनेत मुलांना शिक्षण, भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य आदी बाबी शासन पुरविते. याकरिता प्रकल्प राबविते. यात शाळा निवड, शाळेची गुणवत्ता तपासणी या अन्‌ अशा अनेक बाबी यात येतात. पालक मुलांना शाळेत पाठवितात, रोजगारासाठी या मुलांचे आई- वडील हे गावोगावी फिरत असतात. त्यांचा कायमस्वरूपी पत्ता एक ठिकाणचा क्‍वचितच सापडतो. या समाजातील मुले शिकावीत, मूळ प्रवाहात यावीत, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सबलीकरण व्हावे, असा संकल्प श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूलचे मार्गदर्शक आमदार सुभाष देशमुख यांनी केला. शैक्षणिक वर्ष 2017 पासून संस्थेत आदिवासी मुली- मुलांकरिता शासनाच्या नियमास अधीन राहून नामांकित शाळा प्रकल्प सुरू केला.

'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !
आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपीच्या निवडणुका नकोच !

सुरवातीच्या काळात इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला. पण नंतर त्यांना समजविण्यात शाळेला यश मिळाले. या प्रकल्पात आजमितीस 178 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोणी बार्शी, करमाळा, सांगोल्याचा तर कोणी उस्मानाबाद, ठाणे, मुंबईचा. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण वडाळ्याच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेत आहेत. 165 एकराचा निसर्गरम्य परिसर, बागबगीचा, खेळाचे साहित्य, गुणवत्ताधारक शिक्षकवृंद आदींनी शैक्षणिक पर्यावरण समृद्ध झालेले आहे. मागील वर्षी कोरोना आला आणि शाळेच्या प्रांगणात खेळणारी, बागडणारी ही मुले आपापल्या घरी गेली. ऑनलाइन शिक्षण देण्याचं आव्हान स्कूलसमोर होतं. ज्यांचा राहण्याचा पत्ता नाही, घर आणि इतर सुविधांची वानवा आहे, त्या ठिकाणी मोबाईल व इतर साधने कोठून आणणार, हा प्रश्‍न सतावत होता. मग शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता संस्थेने रेडिओ भूमीच्या माध्यमातून संस्थेच्या सचिवा अनिता ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली "लोकमंगल रेडिओ स्कूल' ही संकल्पना राबविली. शाळेपासून 40 किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना रोज सकाळी दोन तास रेडिओच्या माध्यमातून शिक्षण दिले. यास काही प्रमाणात शाळेला यश मिळाले.

असे होणार अध्यापन

कोरोना परिस्थिती काहीशी निवळल्यामुळे सध्या "शिक्षण आपल्या दारी' ही योजना संस्थेने हाती घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या योजनेची सुरवात झाली आहे. एकाच दिवशी विविध गावात भेटी देऊन तेथील पारधी समाजाच्या मुले-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या योजनेनुसार महिन्यातून तीनवेळा सर्व गावात वाड्या- वस्त्यांवर / पाड्यावर स्कूलतर्फे वर्ग भरविले जाणार आहेत. प्राथमिकच्या मुलांना भाषा, गणित आणि विज्ञान असे विषय तर माध्यमिकच्या मुलांना सामाजिक शास्त्रे, विज्ञान, इंग्रजी या विषयांचे अध्यापन होणार आहे. प्राचार्य श्रीकांत धारूरकर, आशुतोष देशमुख, नंदकुमार स्वामी, दीपक कापसे, सूरज चव्हाण, प्रशांत झुंजा आदी शिक्षकवृंद परिश्रम घेत आहे.

संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली "नामांकित शाळा' योजनेला गती दिली. "लोकमंगल रेडिओ स्कूल'मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवले. सध्या "शिक्षण आपल्या दारी' उपक्रमदेखील मोफत राबविण्यात येत आहे. शिक्षक तळमळीने यात सहभागी असतात.

- श्रीकांत धारूरकर, प्राचार्य, लोकमंगल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडाळा

बातमीदार : नितीन ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com