लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !

लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !
लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !
लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !
Summary

लोकरक्षण करणारे पोलिस घरांबाबत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात पोलिसांच्या वसाहती असून तेथे नव्याने वसाहती उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोलापूर : शहरात (Solapur City) स्वातंत्र्यपूर्व काळात 1914-15 मध्ये म्हणजे 115 वर्षांपूर्वी तसेच अलीकडील काळात 1960-65 मध्ये म्हणजे 55-60 वर्षांपूर्वी टप्प्या- टप्प्याने पोलिसांसाठी (Police) एक हजार सात घरे बांधली गेली. ब्रिटिशांनी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार पोलिस शिपाई पदासाठी एक रूम, किचन व शौचालय (वन आरके) असे 225 चौरस फुटांचे घर बांधले. त्या काळात उपलब्ध साधनसामग्रीतून छोट्याच टुमदार कौलारू घरांचे बांधकाम केले. आता या वसाहती कालबाह्य झाल्या आहेत. लोकरक्षण करणारे पोलिस घरांबाबत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात पोलिसांच्या वसाहती (Police colony) असून तेथे नव्याने वसाहती उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. हे बांधकाम करत असताना मात्र भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा व आवर्ती महसुली उत्पन्नाचा विचार करावा लागणार आहे.

लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !
नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक !

सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञ अभियंता एन. के. मिरानी यांच्या म्हणण्यानुसार आणि संहितेनुसार, पक्‍क्‍या बांधकामाचे आयुर्मान 70 वर्षे संबोधले आहे. परंतु सोलापुरातील बहुसंख्य पोलिस वसाहतींचे आयुर्मान संपल्यात जमा असतानाही जीव मुठीत धरून ही मंडळी आपल्या कुटुंबीयांसह या इमारतीत आयुष्य कंठत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील बांधकामाच्या इमारतीच्या खिडक्‍या, दरवाजे कुजून निखळून पडत आहेत. ओलाव्यामुळे भिंती फुगल्या आहेत. मलनिस्सारण आणि जलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती अत्यंत शोचनीय आहे. वसाहतींच्या दुरवस्थेमुळे असंख्य पोलिसांनी या घरांपेक्षा भाड्याच्या घराचा आसरा घेतला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या जगण्याच्या प्राथमिक गरजांपैकी शासकीय नोकरीमुळे अन्न व वस्त्राचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी बदललेल्या जीवनशैलीत घरांची वाढीव गरज मात्र दुबळीच राहिली आहे.

कोणत्याही क्षणी कर्तव्यावर जाणे, सतत सतर्क राहणे, कर्तव्याचा कालावधी अनिश्‍चित राहणे या पार्श्‍वभूमीवर पोलिस कर्मचाऱ्यांना उत्तम निवासस्थाने उपलब्ध झाली तर त्यांना कुटुंबाची चिंता राहणार नाही. त्यांच्या कार्यक्षमतेवर याचा चांगला परिणाम होईल. 225 चौरस फुटांचे दोन खोल्यांचे पावसात गळणारे, रंगाचे पोपडे आलेले, भिंती फुगून आकार बदललेल्या, दरवाजे- खिडक्‍या कुजलेल्या घरांमुळे धोक्‍यात आलेली "प्रायव्हसी', यातून आलेले अस्वस्थपण यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. तुंबलेल्या गटारी, मोडकी स्नानगृहे, गंजलेल्या पाइपलाइन, अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्तव्यावरून घरी गेले की असुविधांबाबत कुटुंबीयांच्या तक्रारी तर बाहेर जाताना दुरुस्तीबाबत ऐकावी लागणारी गाऱ्हाणी यातून होणारी चिडचिड सोबत घेऊनच अस्वस्थ मानसिकतेतून तो कर्तव्यावर येतो. धोकादायक इमारतींमुळे कुटुंबाची चिंता, समस्यांचा सामना करीत अस्वस्थ, विचलित मनःस्थितीचा परिणाम त्यांच्या भावनिक व वैचारिक असंतुलनामुळे कर्तव्य कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. तो चिंतामुक्त असेल तरच सामाजिक आरोग्य. शांतता व सक्षमपणे सदैव सज्ज राहील.

लोकरक्षण करणारे पोलिसच घराबाबत मात्र असुरक्षित !
शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले...

पोलिस वसाहती

  • सदर बझार व किल्ला पोलिस वसाहत 1914-15 : 85 गाळे

  • पोलिस मुख्यालय (जुने) 1920-21 : 182 गाळे

  • पोलिस मुख्यालय (नवे) 1937-38 : 168 गाळे

  • शामानगर, कवितानगर, केशवनगर 1948-50 : 508 गाळे

  • रेल्वे पोलिस वसाहत 1961-62 : 40 गाळे

  • जिल्हा कारागृह कर्मचारी वसाहत 1960-65 : 24 गाळे

  • एकूण गाळे : 1007

  • एकूण जागा - दोन लाख 55 हजार 862 चौरस फूट

कायमस्वरूपी आवर्ती महसुलाची सोय

सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी किंवा व्यापारी समूहाच्या आसपास पोलिस वसाहतीच्या जागा आहेत. त्यांचा खासगी विकासकामार्फत "बांधा-वापरा-हस्तांतर करा' (बीओटी) या तत्त्वाचे उत्तम उदाहरण असलेल्या पुष्कराज शासकीय विश्रामगृहाच्या धर्तीवर विकास केल्यास पोलिसांच्या निवासस्थानाबरोबरच भविष्याचीही चिंता मिटेल. या विकासातून विविध प्रकारच्या वास्तू निर्माण करता येतील. याशिवाय याच जागांमध्ये व्यापारी संकुले बांधून त्याद्वारे भाडेरूपाने कायमस्वरूपी आवर्ती महसूल मिळत राहील. याचा उपयोग भविष्यकालीन देखभाल, दुरुस्ती व पोलिस कल्याणासाठी होईल. सध्या देखभाल, दुरुस्तीअभावी झालेली दुरवस्था निदान नव्याने बांधलेल्या वसाहतींची होणार नाही.

अभय दिवाणजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com