

Education Minister Dada Bhuse addressing the Kartiki Wari planning meeting in Pandharpur.
Sakal
पंढरपूर: येत्या २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. यावेळी दर्शन रांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. या संदर्भात मंदिर समिती काय निर्णय घेणार? याकडेच लक्ष लागले आहे.