

Ancient Bhairav idols still guard Tuljabhavani; devotees in Solapur and Dharashiv continue age-old worship traditions.
Sakal
सोलापूर : तुळजाभवानीच्या रक्षणासाठी तुळजापूरच्या भोवती भैरवांचा वेढा आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात हा सांस्कृतिक ठेवा दडलेला आहे. तुळजाभवानीच्या अवतीभवतीचा सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील भैरव उपासनेचा प्रदेश असावा, असे येथील अनेक गावातील भैरवाच्या प्राचीन मूर्तीवर दिसून येते, अशी माहिती इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक विशाल फुटाणे यांनी दिली.