मांगल्य ज्वेलर्समध्ये आठ लाखांची चोरी! चोरट्याने CCTVचा डिव्हीआरही पळविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Theft

या प्रकरणी रेवणकर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली.

मांगल्य ज्वेलर्समध्ये आठ लाखांची चोरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारातील रामकृष्ण महादेव रेवणकर (रा. मुरारजी पेठ) यांचे मांगल्य ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी आठ लाखांचे चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साठेआठ ते शुक्रवारी (ता. 12) सकाळी साडेआठ या वेळेत घडली. चोरट्यांनी त्या दुकानात चोरी केल्यानंतर सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्टोअर होणारा डिव्हीआरच लंपास केला. या प्रकरणी रेवणकर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली.

हेही वाचा: सोलापूर : शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर

शहरातील मध्यवर्ती भागातील सराफ बाजारातील रेवणकर यांच्या ज्वेलर्समध्ये परजिल्ह्यातून आलेल्या चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मांजरे यांनी सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून मांगल्य ज्वेलर्सचे लोखंडी शटर व लोखंडी जाळीचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्या चोरट्यांनी दुकानातून चांदीचे तांबे, ताम्हण, ग्लास, समई, वाटी, पैंजण, जोडवे, बिछवे, वाळे, कडले, बिंदी, चांदीच्या अंगठ्या, लिंगाकार, मेकला, जुनी मोड असा एकूण 23 किलो 945 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल लंपास केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. रेवणकरांच्या दुकानातील चोरी यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शेजारील सुमित्रा ज्वेलर्समध्येही चोरीचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही आणि त्यांनी तिथून पलायन केले, असेही पोलिस उपनिरीक्षक मांजरे यांनी सांगितले.

हेही वाचा: सोलापूर- अक्‍कलकोट बसची तोडफोड; अज्ञाताचे कृत्य

दुसऱ्या सीसीटिव्हीत चोरटे कैद

रेवणकर यांच्या मांगल्य ज्वेलर्समध्ये चोरी केल्यानंतर त्या चोरट्यांनी शेजारील सुमित्रा ज्वेलर्समध्येही चोरीचा प्रयत्न केला. त्यांना दुकानाचे शटर व लोखंडी जाळीचे कुलूप तोडता आले नाही. चोरीचा प्रयत्न फसल्याने ते तिथून पसार झाले. मात्र, त्या दुकानातील सीसीटिव्हीत त्यांचे वाहन व चोरटे कैद झाले. दोन तरुणांनी ही चोरी केली असून त्यांनी चोरीसाठी चारचाकीचा वापर केला आहे. परजिल्ह्यातील चोरटे असावेत, असा पोलिसांना अंदाज आहे.

loading image
go to top