esakal | 'एकरुख' योजनेला मिळणार 50 कोटीचा निधी : सिद्धाराम म्हेत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धाराम म्हेत्रे

'एकरुख' योजनेला मिळणार 50 कोटीचा निधी : सिद्धाराम म्हेत्रे

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्याला वरदायिनी असणाऱ्या एकरुख उपसा सिंचन योजनेला डिसेंबर अखेर 50 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे,तसेच देगाव एक्सप्रेस कॅनोलसाठी 50 कोटीची मागणी व बबलादच्या बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याच्या सर्व्हेसाठी 50 लाखाची तरतूद यासाठी आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकारी व सचिवांसोबत बैठक झाल्याची माहिती माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.

पंधरा दिवसापूर्वी माजी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी नामदार पाटील यांनी बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव कोव्हीकर,सचिव स्वामी, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक राजपूत,भीमा खोरे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता साळे,सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिंदे,पुण्याचे मुख्य अभियंता धुमाळ,काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बरोलगी,कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे,माजी उपसभापती विलासराव गव्हाणे,संजय मोरे,शिवराज स्वामी,स्वीय सहाय्यक मोहन देडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

एकरुख उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्थेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात पन्नास कोटीची तरतूद होणार आहे. एकरुख उपसा सिंचन योजनेच्यामुळे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास 17 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच देगाव एक्सप्रेस कॅनॉलसाठी 26 ते 64 किलोमीटरमधील कामाचे सर्वेक्षण करण्यात यावे व भूसंपादन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील बबलाद केटीवेअरचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याच्या सर्वेसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते. ही बैठक मंत्रालयातील जलसंपदा विभागातील दालनांमध्ये पार पडली.

loading image
go to top