हृदयद्रावक! 'पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण'; ८० वर्षे एकत्र संसार, करमाळा तालुक्यातील घटना..
Emotional Story from Karmala: दगडु शंकर हाके (वय १००) हे वय झाले असले तरी देखील हिंडत फिरत होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाले. बाजेवर येऊन बसल्यावर अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पत्नी केशरबाई यांना सांगितली.
करमाळा : पतीचे निधन झाल्याची बातमी समजताच पत्नीला मोठा धक्का बसला आणि पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना मिरगव्हाण (ता. करमाळा) येथे शनिवारी (ता. १५) दुपारी घडली.