Elderly Pedestrian Fatally Hit by Train: नातेवाईकांडून मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ आगाशे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने तसेच त्यांना श्रवणदोष असल्यामुळे रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वे गाडी येत असल्याचे त्यांना समजले नसावे. येथील पत्रकार अश्विनी तडवळकर यांचे ते वडील होत.
सोलापूर: गोकूळ कॉलनी, मुरारजी पेठ येथील रहिवासी विश्वनाथ एकनाथ आगाशे (वय ७७) यांचा सोमवारी (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास धर्मवीर संभाजी तलाव परिसरात रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलिसात झाली आहे.