Solapur Municipal Elections
sakal
सोलापूर
Solapur Municipal Elections: सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, १ नगरपंचायतीचा वाजला बिगूल; निवडणुकीत एका मतदारास तीन मतांचा अधिकार..
Poll season begins in Solapur: यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. ९०० ते एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र, याप्रमाणे जिल्हाभरात एकूण १५० हून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत. दरम्यान, सांगोला व अक्कलकोट नगरपरिषदेत सदस्य संख्या विषम असल्याने तेथे शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.
सोलापूर: राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. त्यात जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ व अकलूज या नगरपरिषदांचा समावेश आहे. तर अनगर या एकमेव नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होणार आहे. नगरपरिषदांमधील २७२ सदस्य तर अनगर नगरपंचायतीत १७ नगरसेवक आहेत.
