
माळीनगरमधील सहकारी संस्थांची रणधुमाळी
माळीनगर : येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी व शुगरकेन प्रोड्युसर्स विकास सोसायटी या दोन संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पॅनलनिहाय या संस्थांच्या निवडणुका लढविल्या जात असल्याने वाढत्या उन्हाबरोबरच निवडणुकीचा 'फिव्हर' देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शुगरकेन सोसायटीच्या महिलांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या एकूण ११ जागांसाठी त्रैवार्षिक निवडणूक येत्या २२ मे रोजी आहे. या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची मुदत १४ मेपर्यंत आहे.
माळीनगर विकास मंडळ पुरस्कृत पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये या संस्थेची निवडणूक होत आहे. सर्वसाधारण गटाच्या ९ जागांसाठी १८ तर महिलांसाठी राखीव असलेल्या २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ॲड. आदिनाथ भगत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
माळी एज्युकेशन सोसायटी उमेदवार :
माळीनगर विकास मंडळ पुरस्कृत पॅनल ः सर्वसाधारण गट - नितीन इनामके, संजय राऊत, दिनेश ताम्हाणे, गीतेश पांढरे, पृथ्वीराज भोंगळे, ॲड. सचिन बधे, अंबर जगताप, प्रकाश गिरमे, अजय गिरमे. महिला गट - ज्योती लांडगे, लीना गिरमे.
परिवर्तन पॅनल ः सर्वसाधारण गट : अनिल रासकर, रत्नदीप बोरावके, डॉ. अविनाश जाधव (भोंगळे), पंकज गिरमे, कल्पेश पांढरे, प्रीतम राऊत, अनिकेत गिरमे, अजिंक्य जाधव, निरंजन बोरावके. महिला गट : शीतल इनामके, अर्चना रासकर
शुगरकेन सोसायटी उमेदवार
भटक्या विमुक्त जाती व जमाती गट : मनोहर जाधव, अनुसूचित जाती व जमाती गट ः मनोहर जाधव
विकास पॅनल ः सर्वसाधारण गट : जयवंत चौरे, सुरेश राऊत, अमोल ताम्हाणे, मनीष रासकर, नामदेव आगम, दीपक गायकवाड, कपिल भोंगळे, समीर झगडे. ओबीसी गट : हेमंत गिरमे, महिला गट : विद्या गिरमे (बिनविरोध)
स्वाभिमानी पॅनल ः सर्वसाधारण गट - रवींद्र पांढरे, संजय (सचिन) राऊत, परेश नवले, विशाल गिरमे, सुरेंद्र बधे, कल्पेश पांढरे, धनेश
शिंदे, ओबीसी गट : कुणाल इनामके, महिला गट : अलका बोरावके (बिनविरोध)
शुगरकेनच्या १३ जागांसाठी ११ जूनला मतदान
शुगरकेन सोसायटीच्या १३ जागांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ११ जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. या निवडणुकीत विकास पॅनल व स्वाभिमानी पॅनल यांच्यात सामना होत आहे. सर्वसाधारण प्रतिनिधींच्या ८ जागांसाठी १५ उमेदवार आखाड्यात आहेत. ओबीसीच्या एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी जी. बी. जाधव निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. दोन्ही संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देत आहेत.
Web Title: Election Co Operative Societies Malinagar Sugarcane Society
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..