निवडणुकीचा बिगुल वाजला; सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान
निवडणुकीचा बिगुल वाजला; सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेली माढा व माळशिरस नगरपंचायत, नव्याने निर्माण झालेली महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

हेही वाचा: एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

जिल्ह्यातील या पाच नगरपंचायतींसाठी २९ नोव्हेंबरला प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ३० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे.

हेही वाचा: लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २२ डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे. जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या अनगर (ता. मोहोळ) वगळता सर्वच नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील जुन्या १० नगरपरिषदा (पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट,कुर्डूवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ) व नव्याने झालेल्या अकलूज नगरपरिषदेसोबत अनगरची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याची शक्‍यता आहे.

"जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता फक्त त्या नगरपंचायत हद्दीत पुरतीच असणार आहे. या पाच नगरपंचायतीच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे."

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

loading image
go to top