सोलापूर बार असोसिएशनची ११ नोव्हेंबरला निवडणूक! ३ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला प्रारंभ

सोलापूर बार असोसिएशन अध्यक्षांची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार आता बार असोसिएशनच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला आहे. त्यानुसार निवडणूक ११ नाव्हेंबर रोजी होणार असून ३ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला प्रारंभ होणार आहे.
Sakal-Exclusive
Sakal-Exclusivesakal

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशन अध्यक्षांची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार आता बार असोसिएशनच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला आहे. त्यानुसार निवडणूक ११ नाव्हेंबर रोजी होणार असून ३ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला प्रारंभ होणार आहे. मागील निवडणुकीत ॲड. निलेश ठोकडे यांनी विरोधातील ॲड. सुरेश गायकवाड यांच्या पॅनलचा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.

सोलापूर बार असोसिएशनअंतर्गत मागील निवडणुकीत एक हजार ३३३ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता निवडणुकीपूर्वी संबंधित सदस्य वकिलांकडून वर्गणी भरून घेतली जात आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार ॲड. सुरेश गायकवाड यांनी जवळपास दोनशे जणांची वर्गणी स्वत: भरल्याची चर्चा आहे. आज (शुक्रवारी) वर्गणी भरण्याची शेवटची मुदत होती. जवळपास तेराशे वकिलांनी वर्गणी भरली आहे. जिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांना स्वत:च्या हक्काचे चेंबर असावेत ही अनेक वर्षांपासून मागणी आहे. न्यायालयात पार्किंगची पुरेशी सोय नाही. याच मुद्द्यांवर आता ही निवडणूक पुन्हा लढविली जाईल, असे बोलले जात आहे. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी नवीन पदाधिकारी पदग्रहण करतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीचा असा आहे प्रोग्राम

  • प्रारुप मतदार यादी प्रसिध्द : ३१ ऑक्टोबर

  • अंतिम यादी प्रसिध्द : २ नोव्हेंबर

  • अर्ज भरण्यास प्रारंभ : ३ ते ४ नोव्हेंबर

  • अर्जावर हरकती : ५ नोव्हेंबर

  • उमेदवारी माघार : ८ नोव्हेंबर

  • मतदान व मतमोजणी : ११ नोव्हेंबर

निवडणुकीत ॲड. गायकवाडांच्या विरोधात कोण?

बार असोसिएशनच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता या निवडणुकीत आपला पॅनल बहुमत मिळवून आपण अध्यक्ष कशाप्रकारे होऊ, याची रणनिती ॲड. सुरेश गायकवाड यांनी आखायला सुरवात केली आहे. वकिलांशी संपर्क, त्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्यांच्याविरूध्द कोण निवडणूक लढविणार, कोणाच्या नेतृत्वाखाली पॅनल असणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com