Solapur News : करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या विहिरीचा कारभार चव्हाट्यावर

तांत्रिक अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे काढत असल्याच्या तक्रारी
employment guarantee well Karmala complaints about technical officers extracting money from farmers solapur
employment guarantee well Karmala complaints about technical officers extracting money from farmers solapuresakal

करमाळा : करमाळा पंचायत रोजगार हमी च्या कामाचा विषय आता चव्हाट्यावर आला आहे.रोजगार हमी योजनेतुन मंजुर झालेली विहीर नदीच्याकडेला शेतकरी स्वतःच्याच शेतात विहीर खोदता येत नाही असे तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके सांगत असुन संबंधित शेतकऱ्यांला शासकीय लाभापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार संबंधित शेतक-यांने केली आहे.

विशेष म्हणजे नदीच्या कडेला स्वतःच्या शेतात रोजगार हमीची विहीर घेता येणार नाही असा उल्लेख शासकीय आदेशात कोठेही नसताना जाणीवपूर्वक संबंधित शेतकऱ्याला शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे

रोजगार हमीच्या विहिरी करण्यासाठी आणि मस्टर भरून बिल काढण्यासाठी तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके हे शेतकऱ्यांना नको ते नियम दाखवून पैसे काढत आहेत. एका विहिरी साठी शेतकऱ्यांकडून 25 ते 30 हजार रुपये घेतल्याशिवाय त्यांचे मस्टर भरले जात नाहीत

याबाबत गेली अनेक दिवसांपासून तालुक्यात उघड चर्चा सुरू आहे संबंधित अधिकाऱ्याला नेमके कोण पाठीशी घालत आहे संबंधित अधिकाऱ्याची एवढे धाडस कसे होत आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

त्यातच बिटरगाव श्री येथील रामराव मुरूमकर या शेतकऱ्याला विहीर सुरू करण्याच्या वेळी संबंधित अधिकाऱ्याने अडवले आहे. यापूर्वी देखील रोजगार हमी शाखेतील तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके यांच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी झाली आहेत.मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

बिटरगाव श्री येतील शेतकऱ्याला विहीर मंजूर झाल्यानंतर सध्या विहीर सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केल्या नंतर करमाळा पंचायत समितीतील तांत्रिक अधिकारी फाळके यांनी नदीच्या बाजूला तुम्हाला विहीर होता येणार नाही असे सांगितले. मात्र शासनाने रोजगार हमीच्या विहिरीच्या निकषात हा नियम कुठेही घातलेला नसताना जाणीवपूर्वक त्यांनी ही विहीर अडवली आहे.

याबाबत आम्ही वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन तुम्हाला पुढील निर्णय देऊ असे संबंधित शेतकऱ्याला सांगितले यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. रोजगार हमी योजनेत मंजूर झालेली विहिरी करण्यास त्यांनी लाभार्थ्याला अडथळा आणला असून याला करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांना याबाबत तात्काळ निर्णय घेण्याबाबत मागणी केली असता वरिष्ठाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे त्यांनी संबंधित लाभार्थीला सांगितले.

करमाळा पंचायत समितीच्या वतीने गेली वर्षभरात रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता दिसून आली आहे .रोजगार हमीच्या एकूण कामाच्या उद्दिष्टात पैकी केवळ 42 टक्के उद्दिष्ट करमाळा पंचायत समितीच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमीचे काम करण्यात करमाळा तालुका शेवटच्या म्हणजे 11 व्या क्रमांकावरती आहे.

रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीची काम करण्यासाठी शेतकऱ्यांकडून थेट पैसे घेतले असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत. मात्र हे सांगताना शेतकरी स्वतःचे नाव सांगण्यास घाबरतात कारण नंतर त्यांना तुम्ही जर कुठे पैसे दिल्याचे बोलला तर तुम्हाला अडकवेल असा दम फाळके यांनी दिला असल्याचा एका शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या बोलीवरती सांगितले.

याशिवाय फाळके हे कोणत्याही शेतकऱ्याला कार्यालयात भेटत नाहीत ते कायम मी व्हिजिटला गेलो आहे असे सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

पंचायत समितीतील रोजगार हमी शाखेतील विवेकानंद फाळके यांच्याबाबत अनेक तक्रारी आले आहेत. फाळके हे कार्यालयात पदाधिकाऱ्यांना वेळेवर भेटत नाहीत तर ते शेतकऱ्यांना केव्हा भेटणार? विहिरीची बिले काढण्यासाठी फाळके यांच्याकडून पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी आले आहेत याबाबत रोजगार हमी मंत्र्याकडे तक्रार केली आहे .

- गहिनीनाथ ननवरे, माजी पंचायत समिती सभापती करमाळा

रोजगार हमी शाखेतील तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके यांच्या विरोधात तक्रार आली आहे.मात्र संबंधित शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

- राजाराम भोंग, गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com