
सोलापूर : जनभावना ध्यानात घेऊन महापालिकेने सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य दिशेकडील प्रवेशद्वारालगतच्या स्वच्छतागृहाचा ठेका रद्द केला. स्वच्छतागृहाची इमारत न पाडता, त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षकांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यालय उभारण्याचे काम गतीने सुरू झाले. दरम्यान, या कार्यालयालाच अडथळा ठरेल अशा रीतीने रातोरात रिक्षा स्टॉपचा फलक रोवून अतिक्रमण केल्याचे सोमवारी निदर्शनास आले आहे.