prakash baviskar
sakal
बार्शी - शहरातील गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असून अद्याप बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली आहे.