अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले

अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले
अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले
अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकलेCanva
Summary

कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर तिसऱ्या लाटेपूर्वी शहर व ग्रामीणमधील विविध परिसरातील प्रत्येकी एक हजार व्यक्‍तींचा सिरो सर्व्हे केला जात आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांनंतर तिसऱ्या लाटेपूर्वी शहर व ग्रामीणमधील विविध परिसरातील प्रत्येकी एक हजार व्यक्‍तींचा सिरो सर्व्हे केला जात आहे. तत्पूर्वी, डेंग्यूसदृश (Dengue) रुग्णांच्या रक्‍त तपासणीत ज्येष्ठ नागरिक, तरुणांच्या तुलनेत 14 वर्षांखालील काही मुलांना कोरोना (Corona) होऊन गेल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. रोगप्रतिकारक शक्‍तीमुळे (Immunity) कोरोनाचा त्यांना काहीच त्रास झाला नाही, ते आपोआप त्यातून बरे झाल्याचेही समोर आले आहे.

अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील!

शहरात यंदा 319 जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर ग्रामीणमध्ये जानेवारी ते 7 सप्टेंबरपर्यंत 74 व्यक्‍ती डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. आतापर्यंत शहरातील 798 पैकी साडेसहाशे जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. डेंग्यूसदृश प्रत्येक दहा मुलांपैकी दोन ते तीन मुलांना यापूर्वीच कोरोना होऊन गेल्याचे दिसून आले आहे. ग्रामीणमध्येही त्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात आढळून आले आहे. सप्टेंबरमध्ये शहरातील 156 संशयितांमध्ये 37 जणांना डेंग्यूची बाधा झाली असून ग्रामीणमधील 57 पैकी 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शाळा बंद असल्याने मुले घरातच असून त्यांचे पालन-पोषण व्यवस्थित झाल्याने त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्‍ती वाढल्याचे चित्र आहे. संतुलित, पौष्टिक आहारामुळे, पालकांचे लसीकरण, यामुळे कोरोना होऊनही मुलांना त्याचा फारसा त्रास झाला नाही, अशी माहिती महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

वयोगटानुसार मुलांची संख्या

  • 0 ते 4 : 3,77,250

  • 9 ते 9 : 3,93,644

  • 10 ते 14 : 4,33,240

  • 15 ते 19 : 4,21,326

अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले
धवलदादा... हे बी आव्हान हाय बरं का !

चिमुकल्यांमध्ये वाढली रोगप्रतिकारक शक्‍ती

कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर आता तिसरी लाट येणार असून, त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे. परंतु, तिसऱ्या लाटेपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने सिरो सर्व्हे सुरू केला आहे. शहराचा गावठाण, हद्दवाढ भाग, झोपडपट्टी परिसरातील एक हजार व्यक्‍तींच्या रक्‍ताचे नमुने घेऊन त्यांच्यातील ऍन्टीबॉडीची पडताळणी सुरू आहे. त्यामध्येही लहान मुलांसह अन्य वयोगटातील काही व्यक्‍तींना यापूर्वीच कोरोनाची लागण होऊन गेली, परंतु त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्‍तीमुळे ते आपोआप बरे झाल्याचे निर्दशनास आले आहे.

डेंग्यूसदृश बालकांची रक्‍त तपासणी केली जाते. त्यामध्ये दहातील दोन मुलांना यापूर्वीच कोरोना होऊन गेला, त्यांना त्याचा काहीच त्रास झाला नाही, असे निर्दशनास आले आहे. लसीकरण, घरातील बहुतेक जणांना कोरोनाची बाधा, रोगप्रतिकारक शक्‍ती अधिक असल्याने ते शक्‍य झाले आहे.

- डॉ. वैशाली शिरशेट्टी, माता व बालसंगोपन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com