आमिर खानच्या फाउंडेशनची कमाल ! विनापाऊस बोअरमधून वाहतेय पाणी

आमिर खानच्या फाउंडेशनची कमाल ! विनापाऊस बोअरमधून वाहतेय पाणी
आमिर खानच्या फाउंडेशनची कमाल
आमिर खानच्या फाउंडेशनची कमालCanva
Summary

हा काही दैवी चमत्कार नाही तर कष्टाने केलेल्या कामाची पावती प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे.

बार्शी (सोलापूर) : हा काही दैवी चमत्कार नाही तर कष्टाने केलेल्या कामाची पावती प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. पावसाचे पाणी आपल्याच गावात अडवा अन्‌ जिरवा असा पाणी फाउंडेशनचा (Water Foundation) उपक्रम मांडेगाव (ता. बार्शी) (Barshi) येथे राबविण्यात आला होता. याचे फलित आता प्रत्यक्षात पाहायला मिळत असून, सरासरी एवढा पाऊस झालेला नसतानाही बोअरमधून पाणी वाहताना दिसत असल्याची माहिती सरपंच पंडित मिरगणे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (Even though it has not rained, water is flowing from the borewell at Mandegaon-ssd73)

आमिर खानच्या फाउंडेशनची कमाल
अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!

जमीन सपाटीपासून खोल शेतजमीन असेल तर बोअर सुरू न करताही पाणी येणे ठीक आहे; पण गावाच्या उंच भागात असलेल्या शेतकरी विष्णू मिरगणे यांच्या शेतात घेतलेल्या बोअरमध्ये दिवसभर पाणी वाहताना दिसत आहे. पाणी फाउंडेशनचे काम मागील तीन वर्षांपासून मांडेगाव येथे सुरू असून फाउंडेशनचे आमिर खान (Amir Khan), किरण राव (Kiran Rao) यांच्यासह त्यांच्या टीमचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान आहे, असेही सरपंच पंडित मिरगणे यांनी या वेळी सांगितले.

आमिर खानच्या फाउंडेशनची कमाल
ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या फळाचे महत्त्व

मागील पाच दिवसांपासून बोअर सुरू केला नाही तरी पाणी वाहत आहे. पाऊस थोडा झालेला आहे पण नाले, बंधाऱ्यांमुळे फरक पडला आहे. तसेच येथून तलाव एक किलोमीटर अंतरावर आहे, असे शेतकरी विष्णू मिरगणे यांनी स्पष्ट केले. मांडेगाव येथे लोकसहभागातून पाच बंधाऱ्यांचे काम करण्यात आले. ओढा, नदी खोलीकरणाचे तसेच गावतळ्यातील गाळ काढण्यात आला आहे. सहाव्या बंधाऱ्याचे काम सुरू असून झालेल्या कामांमुळे पाणी जिरण्याची क्षमता वाढली आहे.

तालुक्‍यातील प्रत्येक गावाने पडलेल्या पावसाचे पाणी आपल्याच गावात अडवले व जिरवले तर निश्‍चित फायदा होतो, याचे उत्तम उदाहरण मांडेगाव येथे पाहायला मिळत आहे. असे काम केले तर निश्‍चित शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.

- पंडित मिरगणे, सरपंच मांडेगाव, ता. बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com