तलाव आहे भरलेला पण पाणी नाही शेतीला ! शिरनांदगी तलावातून पाणी देण्याची शेतकऱ्यांतून मागणी

Shinandagi.
Shinandagi.
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याच्या दक्षिण भागातील शिरनांदगी तलाव हा म्हैसाळच्या पाण्यासह पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे. परंतु तलावाच्या पाण्याचा उपयोग शेतीला होत नसल्यामुळे "तलाव आहे भरलेला पण पाणी नाही शेतीला' अशी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून बागायत शेतीतील पिके जळत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून कोरडा असलेला शिरनांदगी तलाव भरण्याच्या दृष्टीने गतवर्षी जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी येथे तलावात आंदोलन केले. सोडलेले पाणी लगेच बंद करण्यात आले. याला राजकीय संदर्भ असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला. परंतु सत्ता बदलानंतर स्व. आमदार भारत भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून हे पाणी तलावात सोडण्यासाठी आपले वर्चस्व पणाला लावले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी हे म्हैसाळच्या कालव्याद्वारे सोडले. दरम्यान, त्याच काळात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे तलाव पाण्याने काठोकाठ भरून वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकरी सुखावले. पाणी पूजन प्रसंगी स्व. भालके यांना, तलाव भरला, परंतु वितरिकेची कामे केल्यास या भागात असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या बागायत शेतीला लाभ होणार असल्याचे सांगताच स्व. भालके यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाला जेसीबीच्या साह्याने कालव्यातील पाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व फिरंगीची झाडे तोडण्याच्या सूचना दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले. परंतु दहा ते बारा दिवसांत काम पूर्णपणे थांबविण्यात आल्याने वितरिकेचे पूर्ण काम झाले नाही. 

तलाव भरल्यापासून अद्यापही पाणी शेतीसाठी सोडण्यात आले नाही. या पाण्याचा उपयोग या भागातील शेतकऱ्याला होत नाही. सध्या उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्यामुळे रब्बी हंमागातील बागायती पिके जळून चालली आहेत. त्यामध्ये मका, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सध्या तलावातील पाणी तत्काळ शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

या भागातील शेतकऱ्यांची मागणी व स्व. आमदार भारत भालके यांचा पाठपुरावा लक्षात घेता आपणही या भागातील शेतीला पाणी मिळावे व पिकांचे जतन व्हावे म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे याबाबतची मागणी केली आहे. 
- भगीरथ भालके, 
अध्यक्ष, विठ्ठल साखर कारखाना 

स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे 21 वर्षे प्रतीक्षेत असलेल्या म्हैसाळचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने तलावात पाणी येऊन पूर्णपणे भरला असला, तरी त्यालगत शेती वगळता परिसरातील इतर शेतीला या पाण्याचा लाभ होत नाही. प्रशासनाला वारंवार याबाबतच्या सूचना दिल्या तरी देखील लक्ष दिले जात नाही. कालव्यातील फिरंगी झाडे व इतर अडथळे दूर करून शेतीला पाणी दिले जावे. 
- मायाक्का थोरबोले, 
सरपंच, शिरनांदगी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com