सर्वांना उजनीतील पाण्याची चिंता तर कॉंग्रेसचा पालकमंत्रिपदावर डोळा !

सर्वांना उजनीतील पाण्याची चिंता तर कॉंग्रेसचा पालकमंत्रिपदावर डोळा
Shinde_Bharne
Shinde_BharneCanva

सोलापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वर्षानुवर्षे विरोधात असलेली शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेली आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या सहकार्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. तेव्हापासून कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यावे अथवा पालकमंत्री करावे, अशी मागणी होत आहे. आता उजनीच्या पाण्यावरून सर्वजण चिंतेत असताना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी लावून धरली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा बदलले आणि तिसऱ्यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर धुरा सोपविण्यात आली. जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असल्याने त्याचा फायदा पक्षाला होईल, असा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आणि त्यांना पालकमंत्रिपद दिले. प्रारंभी ते फोन उचलत नसल्याचा आरोप शिवसेना, कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर इंदापूरलाच प्राधान्य देणाऱ्या भरणे यांनी सोलापूरकडे लक्ष द्यायला सुरवात केली आणि नाराजांशी समझोता केला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. मात्र, बैठकीला बोलावले नाही म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांना बदलण्याचीच मागणी केली. तर काहीजणांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडेही तशी मागणी केल्याची चर्चा आहे. उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी त्या निर्णयाला विरोध करीत असतानाच कॉंग्रेसचे पदाधिकारी मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी करीत आहेत, याचे आश्‍चर्यच.

Shinde_Bharne
लसीचा पहिला डोस घेतलेल्या 93 वर्षीय आजोबा व 52 वर्षीय मुलाने केली कोरोनाला चित !

संजय शिंदे समर्थकांनाही आशा

विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. राज्यात भाजपची पुन्हा सत्ता येईल या आशेने त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सत्ता बदलली आणि संजय शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीकता साधली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध असलेले संजय शिंदे यांचे वजन वाढले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्रा असो वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील प्रश्‍नांवर संजय शिंदे हे थेट अजित पवार यांच्याशी संपर्क करतात. त्यामुळे आता पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे.

Shinde_Bharne
मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

आमदार प्रणिती शिंदे यांची सुप्त इच्छा?

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कॉंग्रेसला मिळावे, अशी मागणी सुरवातीपासूनच कॉंग्रेसचे पदाधिकारी करीत आहेत. सरकार स्थापन होताना तशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. मात्र, त्यांच्या मनात पालकमंत्री अथवा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी सुप्त इच्छा आहेच. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना सामाजिक न्याय विभागाचा पदभार देऊन मंत्रालयात स्वतंत्र कक्ष तयार करून दिला. तर पक्षाचे कार्याध्यक्षपदही दिले. तरीही त्यापेक्षा पदाधिकाऱ्यांसह पक्षातील कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षवाढीसाठी मंत्रिपद मिळावे, अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. उजनीच्या पाण्यावरून सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आले असतानाही त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी अद्याप एकही प्रतिक्रिया दिली नाही, हे विशेष. त्यांचे पदाधिकारी मात्र, थेट पालकमंत्री बदलून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा, अशी मागणी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com