EVMs arriving in Solapur from Madhya Pradesh; preparations begin for Zilla Parishad elections.
Sakal
सोलापूर
Solapur News: सोलापुरात मध्य प्रदेशातून आल्या ‘ईव्हीएम’; नगर परिषदेनंतर जिल्हा परिषदेला वापरणार याच मशिन
After Nagar Parishad Elections: मध्य प्रदेशातून सोलापूरसाठी ३ हजार ३६६ कंट्रोल युनिट व ७ हजार ५०० बॅलेट युनिट आणले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार ८५० मतदान केंद्र असणार आहेत. या साठी ३ हजार १६८ कंट्रोल युनिटची तर ६ हजार २७६ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे.
सोलापूर : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कधीही प्रक्रिया सुरू, होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत. मध्य प्रदेशातील ईव्हीएम आज सोलापुरात दाखल झाल्या असून या मशिन रामवाडी गोदामात उतरवून घेण्यात आल्या आहेत.

