'माध्यमिक'ची 30 नोव्हेंबरपर्यंत सत्र परीक्षा! विद्यार्थ्यांच्या घरी प्रश्‍नपत्रिका | Educational | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माध्यमिक'ची 30 सत्र परीक्षा! विद्यार्थ्यांच्या घरी प्रश्‍नपत्रिका
'माध्यमिक'ची 30 नोव्हेंबरपर्यंत सत्र परीक्षा! विद्यार्थ्यांच्या घरी प्रश्‍नपत्रिका

'माध्यमिक'ची सत्र परीक्षा! विद्यार्थ्यांच्या घरी प्रश्‍नपत्रिका

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दिवाळीच्या (Diwali) सुट्टीनंतर माध्यमिक शाळांची (School) घंटा पुन्हा वाजली आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर (Bhaskarrao Babar) यांनी दिली. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा: 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!जाणून घ्या सविस्तर

जिल्ह्यात माध्यमिकच्या एक हजार 87 शाळा असून त्यात जवळपास अडीच लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरम्यान, शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, परंतु अजूनही पहिली ते सातवीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. तर ग्रामीणमध्येही पहिली ते चौथीच्या शाळांसाठी अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. तरीही, कोरोनाचे नियम पाळून पहिली ते चौथीच्या बहुतेक शाळा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील पहिली ते सातवीचे शिक्षक गृहभेटीच्या माध्यमातून घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव पाहून शालेय शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवल्या होत्या. दुसरी लाट आटोक्‍यात आली अन्‌ मृत्यूदर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच दिवाळी सुट्ट्या जाहीर झाल्या. त्यानंतर लगेचच सत्र परीक्षा घेतली जात आहे.

हेही वाचा: चालू आर्थिक वर्षात SBI ला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा!

शिक्षकच सोडवू लागले पेपर?

मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दिवाळी सुट्ट्या जाहीर झाल्या. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर लगेचच सत्र परीक्षा घेतली जात आहे. त्यावेळी पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगू लागल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग बंद असल्याने त्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका घरी देऊन सोडवून घेतली जात आहे. त्यामुळे या सत्र परीक्षेच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

दिवाळी सुट्टीनंतर पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली जात आहे. मुख्याध्यापक संघातर्फे 23 ते 30 नोव्हेंबर या वेळेत ही सत्र परीक्षा घेतली जात आहे. शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग बंद असल्याने त्या विद्यार्थ्यांकडून घरबसल्या प्रश्‍नपत्रिका सोडवून घेतली जात आहे.

- भास्करराव बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

loading image
go to top