
Minor Irrigation Dept Confirms All Lakes Overflowing Except Karjagi"
Sakal
अक्कलकोट : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे व तलाव भरून वाहत आहेत. तसेच बोरी मध्यम प्रकल्प म्हणजे कुरनूर धरण सुद्धा गेल्या महिनाभरापासून तुडुंब भरून जादा पाणी खाली सोडण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यातील एखादा अपवाद सोडला तर सर्व तलाव, पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.