
“Excess rain batters Solapur – Crops on 1.33 lakh hectares damaged, 1.54 lakh farmers hit.”
Sakal
सोलापूर: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३७९ गावातील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.