
सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील १९ दिवसांत हातभट्ट्यांवर धाडी टाकून ४३ हजार लिटर गुळमिश्रित रसायन, दोन हजार ८१२ लिटर हातभट्टी व देशी-विदेशी दारू, असा एकूण २० लाख ७९ हजार २२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.