केएलई संस्थेचा 105 वा वर्धापन दिन उत्साहात 

KLE.jpg
KLE.jpg
Updated on

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी (के.एल.ई) संस्था ही ज्ञानदान करणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे, असे मत मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी व्यक्त केले. 

कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कुल येथे के एल ई संस्थेचा"105" वा संस्थापनादिन निमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. 
सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील,उपमुख्याध्यापिका सुरेखा म्हमाणे, प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांनी के एल ई संस्थेच्या 105 व्या स्थापना दिनानिमित्त संस्थेची स्थापना करणारे"सप्तर्षी"यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी 105 व्या संस्थापनादिनाच्या शुभेच्छा देवून म्हणाले, या संस्थेचे 272 शाखा आहेत. या संस्थे मधून एक लाख पंचवीस हजार विद्यार्थी ज्ञान संपादन करतात 1916 साली स्थापन झालेली संस्था आज ज्ञानदानाचा वटवृक्ष बनली आहे. 
याप्रसंगी राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धेमध्ये प्रथम सई धनंजय लामकाने व द्वितीय क्रमांक विजेता राज्यरत्न बेलभांडरे यांचा सत्कार पुष्प सन्मान चिन्ह देऊन मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केला. प्रशालेतील सहशिक्षक सिद्रामप्पा तंबाके यांनी मनोगतातून संस्थेच्या झालेल्या प्रगतीमधील विविध टप्पे सांगितले. 
सहशिक्षिका सुश्‍मिता कोरे यांनी कन्नड भाषेतून उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले,आनंद कवठे यांनी यादीवाचन केले, तर सहशिक्षक उमेश लोहार यांनी सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागप्रमुखा अंजली घाटे यांनी परिश्रम घेतले.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Marathi News Esakal
www.esakal.com