Solapur News : संशोधनाच्या बळावर केळीची निर्यात इराकला

शेतातील सुपीकता व पीक वाढीचे जैवविज्ञानावर संशोधन करून शेतातच त्याची उपलब्धता तयार करण्याचे काम शुभम बागल या शेतकऱ्याने करून दाखवले आहे. त्यांच्या या संशोधनाच्या बळावर त्यांची केळी इराकला निर्यात झाली आहे.
Solapur News
Solapur News sakal

सोलापूर : शेतातील सुपीकता व पीक वाढीचे जैवविज्ञानावर संशोधन करून शेतातच त्याची उपलब्धता तयार करण्याचे काम शुभम बागल या शेतकऱ्याने करून दाखवले आहे. त्यांच्या या संशोधनाच्या बळावर त्यांची केळी इराकला निर्यात झाली आहे.

वाखरी (ता. पंढरपूर) येथील संगणक पदवीधर शुभम बागल यांनी शेतात काम सुरु केले. तेव्हा त्यांनी विज्ञान व गोआधारीत शेती या दोन्ही आधारावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. त्यांनी शेतीची सुपीकता वाढीसाठी माती परीक्षण करून गरजेच्या घटकाचे विश्लेषण केले. पिकांसाठी सुक्ष्म मूलद्रव्ये लागतात ती शेतातच कच्चा माल आणून तयार केली. त्यामुळे बाजारात पिकांच्या वाढीसाठी लागणारी सुक्ष्ममुलद्रव्ये, जिवाणू खत, ह्युमीक ॲसिड, संजीवके हे सर्व प्रकार महाग दराने विकत न घेता ते शेतात करून त्याचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना अल्पदरातच हे साहित्य शेतात उपलब्ध करून घेतले.

या सर्व संशोधनाचा परिणाम साधत त्यांनी कसदार पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. त्यांनी केळीचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांची केळी इराकला निर्यात झाली. त्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतल्यावर गुणवत्तेच्या आधारावर जादा भाव मिळवला. खरबुजाची विक्रीदेखील जादा दराने केली. या प्रमाणे टोमॅटो, कांदा या पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले.

ऊस भूषण पुरस्कार

त्यांनी उसावरील रासायनिक खत वापरणे कमी केले. रासायनिक खते वापरून उतारा ६० -७० टन असायचा. सेंद्रिय पद्धतीने त्यांनी सहा बाय दीड अंतरावर लागवड करत ८७ टनाचा उतारा मिळवला. खताचा खर्च संपल्याने त्याचा आर्थिक लाभ वाढला. या कामगिरीबद्दल त्यांना ऊस भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.

ठळक बाबी

  • - जीवामृत, अमिल अर्क (आले मिरची लसूण), वेमिल अर्क (वेखंड मिरची लसूण)

  • - वेस्ट डी कंपोजर, दशपर्णी अर्क, खेकडा अर्क, मासळी अर्काचा वापर

  • - दहा ड्रम थियरीचा वापर

  • - ५०० रुपयाचे जिवाणू खत शेतात फक्त ५ रुपयात तयार केले

  • - शेतात तयार केलेले जीवाणूखत तीन पट प्रभावी

  • - फक्त १० रुपये प्रती लिटर खर्चात मायक्रोन्युट्रीयंटची निर्मिती

  • - पोलिस किसान सहकारी संस्थेचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन

  • - तयार केलेल्या खतांची प्रयोगशाळेतून तपासणी

आधुनिक व पारंपरिक शेतीचा संगम

ईएम जिवाणू, सुडोमोनस, बॅसिलस, ट्रायकोडर्मा, बिव्हरिया, मेटारायझम रायझोबीयम, व्हर्टीसिलियम, पॅसिलोमिसिस , अंपिलोमिसिस पिकांना नैसर्गिक पद्धतीने पोषण घटक उपलब्ध करून देणारे जिवाणू चे कल्चर त्यांनी शेतात वाढवले. हे कल्चर वैज्ञानिक पद्धतीने वाढवले व तसेच जिवामृत मिश्रणाचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी नवा बॅक्टेरीयल काऊंट सोलापूर प्रयोगशाळेत तपासून घेतले. त्यामध्ये बॅक्टेरीयल काउंट वाढल्याचे तपासणीत सिद्ध झाले. नंतर त्यांनी शेताची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्यांनी पिकांना पोषक ठरणाऱ्या ॲझटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी या बुरशीचे संवर्धन करून त्याचा उपयोग पिकांसाठी केला. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली व पिकाची गुणवत्ता सुधारून खर्चात बचत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com